वर्धा : डीम युनिव्हर्सिटीमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण लागू करण्यात यावे अशी मागणी निर्माण सोशल फोरमच्या वतीने मा.राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.
डीम युनिव्हर्सिटीज मध्ये एससी, एसटी आणि ओबीसी यांना नियमानुसार आरक्षण देण्यात येत नसून संपूर्ण डीमेड युनिव्हर्सिटी मनमानी करून अनेक बहुजन विद्यार्थांना आरक्षणापासून वंचित ठेवत आहे त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण देण्यात यावे असे निवेदनात म्हण्टलेले आहे.
यावेळी माजी नगर सेवक शेख सालीम( सल्लूभाई), अमित देशभ्रतार, प्रतीक बोधे, यश गोवर्धन, आणि मनोज कांबळे उपस्थित होते.