वर्धा : वर्धा मार्गावरील बंडू जोशी यांच्या पेट्रोल पंपाच्या मागील भागांतील खाली जागेत असलेल्या खोल खड्डातील पाण्यात बुडवून दोन चिमुकल्याचा करुण अंत झाला. गुरुवारचे सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.
पोलीस सूत्रानुसार देवळीच्या काळ्या पुलाचे परिसरातील तुषार अनिल शेळके(१३) बेद अली आसिफ अली (१२)व इतर याच वयोगटातील दोन मुले जोशी यांचे पेट्रोल पंप च्या मागे असलेल्या खोल खड्याजवळ खेळत होते. यादरम्यान यातील शेळके व अली ही दोन मुले पाण्यात खेळण्यासाठी उतरले असता बुडावयास लागली. त्यामुळे इतर दोन मुले हा सर्व प्रकार पाहून घाबरले व त्यांनी राहत्या घरी जाऊन ही घटना लोकांना सांगितली.
याठिकाणी घरची मंडळी पोहचेपर्यंत दोन्ही मुले बुडून मरण पावली. रात्रीं साडे आठ पर्यंत या दोन्ही मुलांचे शव ग्रामीण रुग्णालयात आणून पोलीस पंचनामा करण्यात आला. मृतक दोन्ही मुले अतिशय गरीब कुटुंबातील होती. दोन्ही मुले वर्ग सातचे विध्यार्थी होते. पाण्याचा हा खड्डा मुरूम खोदून नेल्यामुळे पडला होता. पावसाळ्याच्या पाण्यामुळे हा खडा भरला होता.