दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट : एकीकडे प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने धक्का दिला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे हे काँग्रेसचा झेंडा हाती धरत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शिंदे काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
डावलल्यामुळे अशोक शिंदे नाराज
अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद आहे. 1995 मध्ये शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. मात्र पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलले गेल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.
शिवसेनेच्या माजी खासदारासोबत तीव्र मतभेद
शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाआहे.
कोण आहेत अशोक शिंदे?
अशोक शिंदे हे वर्ध्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार 1995, 1999 आणि 2009 असे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभव अशोक शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शिंदेंकडे राज्यमंत्रिपद
नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश
मुंबईत (मंगळवारी) दुपारी दोन वाजता अशोक शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यापासून नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत. अशोक शिंदेही नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे