महाविद्यालयीन कर्मचार्यांना प्रगती योजना व सातवे वेतन आयोग तात्काळ लागू करा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमंत यांना निवेदनातून मागणी

वर्धा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, येथी विश्राम गृह येथे जिल्ह्यातील अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनी अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी यांना आश्वाशीत प्रगती योजना व सातवे वेतन आयोग तात्काळ सुरू करा अशी मागनी निवेदनातून केली आहे.

यावेळी सामंत यानी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतांना संजय तामगाडगे, अन्वर खान, अनुप मून, राजू मेश्राम, मंगेश गिरडे, दिलीप उपासे, पांडुरंग हजारे, प्रभाकर कामडे, विनोद झोडपे, अरविंद तांदळे, दिनेश भगत, प्रमोद वानखेडे, अजय लोखंडे, श्रीकांत येडे, सौ देशमुख,अविनाश मते आदी कर्मचाऱ्यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here