पेट्रोल टाकून जीवे ठार मारण्याची धमकी! पोलिसात तक्रार दाखल

आर्वी : क्षुल्लक वादातून अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करीत त्याच्या वडिलांवर पेट्रोल टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना शिरपूर येथे घडली.

प्रज्वल जवंजाळ हा मित्रासह बोलत असताना रामेश्वर खडसे हा तेथे आला तुझे वडिल जास्त शहाणे झाले आहे का, असे म्हणत शिवीगाळ करुन जवळ असलेल्या बॉटलमधील पेट्रोल तुच्या वडिलांच्या अंगावर टाकून जीवानिशी ठार मारेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here