कारंजा : वाघाच्या हल्ल्यात वृद्ध गुरख्याचा मृत्यू झाल्याची घटना कारंजा तालुक्यामधील बांगडापूर कोंढाळी रस्त्यालगत असलेल्या 55 आर एफ जोगा वनक्षेत्र मधील जंगल व्याप्त परिसरात घडली श्रीराम मुक्ताजी बिटने वय 72 वर्ष असे मृत व्यक्तिचे नाव आहे.
श्रीराम नेहमीप्रमाणे आपल्या स्वतःच्या म्हशी चारण्यासाठी दिनांक 30 जून 2021 ला सकाळी घेऊन गेलेत परंतु संध्याकाळी म्हशी परत यायच्या वेळेस अंदाजे 5:30 वाजताचे दरम्यान घनदाट जंगलाने व्याप्त परिसरा मध्ये म्हशी परतीच्या वाटेवर असताना वाघाने गुराखी मृतक श्रीराम बिटने यांच्यावर हल्ला गेला हल्ल्यामध्ये मृतक जागीच ठार केले.
संध्याकाळी म्हशी घरी परत आल्या परंतु गुराखी परत न आल्याने गुराख्याच्या कुटुंबामधील मुलं व ग्रामस्थ त्याची शोधाशोध करण्यासाठी नेहमी म्हशी जात असलेल्या दिशेने गेलेत तेव्हा वृद्धाचा मृतदेह जंगल परिसरामध्ये आढळून आला मृतकाच्या मृतदेह एवढा चिन्ह विच्छिन्न अवस्थेमध्ये होता की मृतकाच्या शिराचा भाग धडापासून पूर्णपणे वेगळा होता व त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाघाने हल्ला केल्यानंतर हल्ला केलेल्या ठिकाणापासून मृतकाच्या मृतदेह पाचशे मीटर अंतरापर्यंत फरफटत ओढत नेला होता. त्या ठिकाणी वाघाचे पंजे व केस आढळून आले असल्याची माहिती वनविभागाच्या कडून मिळाली आहे.
मृतकाच्या कुटुंबाला पाच लाख रुपयाची मदत तात्काळ वन विभागाकडून जाहीर करण्यात आली असून घटनास्थळावर कारंज्याचे आर एफ ओ आरबी गायनेर कारंजा बांगडापूर राहाटी येथील वनविभागाचे कर्मचारी चौकशीकरिता घटनास्थळावर दाखल झाले आहेत कारंजा घाडगे तालुक्यामध्ये या जोगा राहाटी आगरगाव कन्नमवार ग्राम या परिसरामध्ये घनदाट जंगल असून वाघाचे मुख्य वावरचे ठिकाण भाग झालेला आहे सतत या ठिकाणी वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत आहे वाघाच्या हल्ल्यात मृत पावल्याची तालुक्यात ही दुसरी घटना आहे.