समुद्रपूर : शेताच्या वहीवाटीसाठी रस्ताच नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून बर्फा येथील शेतकरी न्यायासाठी प्रशासनाकडे येरझारा माराव्या लागत आहे. या शेतकऱ्याला शेतीच्या वहीवाटीसाठी रस्ताच नसल्याने शेती कसावी कशी हा प्रश्न उभा ठाकला आहे. बर्फा येथील शेतकरी सचिन शिंदे यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून या शेतीत जाण्यायेण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतात पिक घेतात येत नाही. या संदर्भात शेतकऱ्याने तालुका प्रशासनाला वारंवार रस्ता मिळण्यासाठी विंनती केलेली आहे.
मात्र तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयावर संबंधित शेतकऱ्यांनी स्थगिती आणल्याने यावर्षी शेती कशी वाहवी ही अडचण निर्माण झाली आहे. यामुळे शेतजमीन पेरणी करता आली नसल्याने शेतात पिक घेता येणार नाही अशी स्थितीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या जगण्याचा आधारचं हिरावला गेला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी तालुका प्रशासनाकडे रस्ता मिळण्यासाठी विंनती अर्ज केल्यावर 22/ 10 / 2020 ला निर्णय देत सर्व्हे क्रमांक 66 आणि 67/2 मधुन रस्ता दिला. मात्र या शेतजमिनीचे वाहितदार यांनी या निर्णयावर स्थगिती आणल्याने सदर प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे न्याय प्रविष्ठ आहे.
शेतकरी सचिन प्रयाग शिंदे यांच्या नावाने मौजा बोडका रिठ शिवारात सर्व्हे क्रमांक 72 शेतजमीन 4 हेक्टर असून यांच्या कुटुंबाची उदरनिर्वाह या शेतीच्या भरोश्यावर असल्याने आर्थिक समस्याचा सामना त्यांना करावा लागत आहे. या शेतकऱ्याला शेतीच्या वहीवाटीसाठी रस्ताच नसल्याने शेती कसावी कशी हा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रशासनाने शेती वाहतीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी सचिन शिंदे यांनी केली आहे.