सेलू : सध्या मराठा, ओबीसी व नोकरीतील मागास वर्गीय पदोन्नती आरक्षणाने महाराष्ट्रात रान पेटले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ( ग्रा.प.,प.स.व जी.प.) ओबीसींचे आरक्षण व मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार व CAA, NRC, NPR च्या माध्यमातून केंद्र सरकार संविधानाची छेडछाड करत असून संविधानाला केंद्र व राज्य सरकार हात लावत असेल तर ते हात मुळासगट भीम टायगर सेना छाटेल असे प्रतिपादन भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके भिम टायगर सेना संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने सेलु येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हनाले.
यावेळी विचारपीठावर विशाल रामटेके शहर अध्यक्ष वर्धा, आशिष जांभुळकर जिल्हा संघटक वर्धा, विशाल नगराळे तालुकाप्रमुख, प्रदीप कांबळे तालुका उपप्रमुख, रवींद्र चाटे पवनार गणेश खेडकर बाळू पाटोळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना दादासाहेब शेळके म्हणाले मुळातच सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाबाबत ओबीसी आयोग नेमणे, ओबीसी जनगणना या बाबतीत राज्य सरकारला सूचना देऊन सुद्धा त्यानी सुप्रीम कोर्टाला अधिकृत माहिती न दिल्यामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झालेले आहे. तसेच नोकरीतील मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण आर्टिकल 335 व आर्टिकल 16 (4)1 नुसार अधिकृत असताना व सुप्रीम कोर्टाचे आदेश देऊन सुद्धा जातीवादी राज्य सरकारने मागास वर्गीययांना जीवनातून उठविण्यासाठी आरक्षण लागू केलं नाही.
त्यामुळे राज्य सरकारला सत्तेतून उठविण्यासाठी एससी एसटी ओबीसी यांनी एकत्र होणे ही काळाची गरज आहे. 2) केंद्र सरकार सुद्धा संविधान बदलण्यासाठी संविधानाची मोडतोड करत असून ते संविधान विरोधी C.A.A, NRC, NPR सारखे कायदे करत आहे.
असे संविधान विरोधी कायदे उधळून लावण्यासाठी भीम टायगर सेनेचे सेनेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून त्या माध्यमातून बहुजनाना संघटित करण्यात येणार आहे. 3) दि.9 ऑगस्ट 2018 दिल्ली येथील जंतर मंतरवर काही मनुवादी संघटनांनी भारतीय संविधान जाळलं यापुढे भारतीय संविधाना बद्दल जर कोनी अपशब्द, फाडणे, व जाळणे यासारखे प्रकार करत असेल तर अशा प्रवृत्ती वर जरब निर्माण करण्यासाठी त्याचा पार्श्वभागात मिरच्या भरण्यासाठी संसदेने कायदा करून त्यात जन्मठेपेची शिक्षा करावी. 4) 7 डिसेंबर 2014 तत्कालीन मंत्री सुषमा स्वराज यांनी भगवत गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करा अशी मागणी केली यापुढे धर्म ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ करा अशी मागणी करण्याची हिंमत होऊ नये यासाठी संसदेने भारतीय संविधानाला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याचा कायदा करावा. 5) राजकीय आरक्षणात अनुसूचीत जाती व जमाती ना राखीव मतदार संघा ऐवजी स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावे जेणेकरून लोकसभा व विधानसभेत अनुसूचित जाती व जमाती मधील चमचे व दलाल व आई घाले निवडून न जाता जातीसाठी माती खाणारे कार्यकर्ते निवडून जातील व त्यामुळे त्या त्या समाजाचा/प्रवर्गाचा फायदा होईल आरक्षणाचा हेतू साध्य होईल. 6) जिथे जिथे अनुसूचित जाती जमाती वर अन्याय अत्याचार झाल्यानंतर ॲट्रॉसिटी गुन्हा करू नये म्हणून आरोपी पैशाच्या जोरावर दरोड्याचे खोटे फिर्याद देऊन गुन्हे दाखल करत आहेत.अशाला जन्मठेपेची शिक्षा करण्याचा कायदा करण्यात यावा. 7) यापुढे ॲट्रॉसिटी प्रकरणात अनुसूचित जाती जमाती वर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करून त्याच्यावरही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
या मागणीसाठी भीम टायगर सेनेचे संविधान जागृती रॅली असल्याचे शेवटी दादासाहेब शेळके याणी म्हटले आहे. यावेळी भिम टायगर सेना सेलू तालुका अध्यक्षपदी आकाश नंदेश्वर यांची निवड करण्यात आली. यावेळी भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.