वर्धा : एटीएम कक्षातून बँटऱ्या ल॑पास करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील चतारी येथील भगवान विश्वनाथ सदार (3६) याला अटक करण्यात अखेर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे तो मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होता.
प्राप्त माहितीनुसार, श्रीकांत पुरुषोत्तम ईखे रा. अमरावती यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की युनियन बँकेच्या एटीएम कक्षातून अज्ञात चोरट्याने बॅटरी चोरून नेली. ईखे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. दरम्यान बोरगाव (मेघे) तसेच स्टेशनफैल या भागातील एटीएममधून बॅटरी चोरी गेल्याची तक्रार अमोल हनुमंत तिघरे रा. बोरगाव यांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदविली.
त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला आणखी गती दिली. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जगदीश जगदेव हिवराळे (३१) रा.बाळापूर, जि. अकोला याला अटक केली. पण मुख्य आरोपी असलेला भगवान विश्वनाथ सदार हा पसार झाला. तर आता पोलिसांनी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने भगवान याला हुडकून काढत त्याला अटक केली. ही कारवाई शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात बाबाराव बोरकुटे, दिवाकर परिमल, सुभाष गावळ, नीतेश देवघरे, विकास मुंडे, पवन निलेकर यांनी केली.