भारत बैलमारे
जाम चौरस्ता : भरधाव वेगने जाणार्या अज्ञात वाहनाच्या धडकेत क्रूझरमधील एका व्यक्तिचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची घटना नागपूर – चंद्रपूर महामार्गावर जाम चौरस्ता येथे शुक्रवार (ता. १८) रात्री एक वाजताच्या सुमारास घडली. जखमींना समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हैद्राबाद येथून कुझर गाडी (क्रमांक सि.जि 07 बि.एफ 8747) प्रवासी घेवून जाम समुद्रपुर मार्गे छतीसगडला गावी जात होती. दरम्यान, जाम चौक परिसरात नागपुर कडून चंद्रपुर कडे जाणा-या अज्ञात ट्रक चालकाने भरधाव वेगाने चालवून कुझरला धडक दिल्याने वाहन पलटी झाले. त्यात गंभीर जखमी रामु फागलाल निशाद (वय 40) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातात बिरबल धलवू साहू (वय 33), नरेश कुमार भानुराम करने (वय 40), अंजली जयराम पटेल (वय 25), निता नरेश करसेल (वय 30), जानकीबाई पुनम साहू (वय 50), मिना निरोतम पटेल (वय 25), होमेश नरेश करसेल (वय 10 ), दिव्यांश जयराम पटेल (वय 5), भुमीका जयराम पटेल (वय 4), आशु निरोतम पटेल आणि चालक किसन चंद्रकुमार यादव (वय 23 वर्ष) रा. सर्व रामपुर जिल्हा राजनगांव छतीगड हे सर्व जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र जामचे पोउपनि सुधाकर कुमरे, पोहवा किशोर येळणे, नरेद्र दिघडे, नागेश तिवारी, देवेद्र पुरी बंडू डडमल, पंकज वैद्य, दिनेश धवने, कांचन नवहते यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
हायवे अँम्बुलनस मध्ये टाकुन उपचाराकरीता समुद्रपुर रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेला रामु फागलाल निशाद (वय 40) याचा मृत्यू झाला. घटनेची माहीती पोलीस स्टेशन समुद्रपुर यांना देण्यात आली. रोडवरील क्षतीग्रस्त कुझर गाडी हॉयड्राच्या साहयाने उचलून सुरक्षीत स्थळी लावून वाहतुक सरळीत करण्यात आली. पुढील तपास पोलीस स्टेशन समुद्रपुर करीत आहे.