वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची खासदारांनी थेट शेतकर्यांच्या बांधावर जात केली पाहणी! नुकसान भरपाई देण्याची शासनाला मागणी

पवनार : परिसरात झालेल्या वादळी पावसाने शेतकर्यंच्या फळबागा जमीणदोस्त केल्याय तर अनेकांच्या घराची परझड झाली. अनेकांची घरे कोसळली तर अनेकांचे छप्पर उडाले, वादळ इतके तिव्र होते की येथील वीजेचे खांब, मोठमोठी झाडे उनमळून कोसळले यात परिसरातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची दखल घेत वर्धा लोकसभा खासदार रामदास तडस यांनी बुधवार (ता. १२) शतकर्यांच्या शेतात जात पाहणी केली. कृषीमंत्र्यांना याची फोनवरुन माहीती देत झालेल्या पिकाची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

यावेळी वादळी पावसाने नुकसान झालेल्या पवनार परिसरातील केळी व पपईच्या बागा असलेले शेतकरी बाबाराव निंबाळकर व मुनाफ शेख यांचे शेतात झालेल्या नुकसानीची व नागरीकांच्या घरांची पाहनी खासदार रामदास तडस यांनी केली. यावेळी कृषी मंत्री दादा घुसे यांना फोनवरुन माहीती देउन शेतकर्याना नुकसान भरपाई देन्याची मागनी केली. यावेळी सोबत वर्ध्याचे तहसीलदार, बीडीओ श्री गांवडे, वर्धा विधान सभा प्रभारी मीलींदजी भेंडे, वर्धा तालुका अध्यक्ष गिरीष कांबले, कीसान मोर्चा अध्यक्ष अजय गांडोळे, शालीनी आदमने सरपंच, प्रमोद लाडे प स सदस्य, राहुल पाटनकर उपसरपंच, ग्राम प सदस्य, तलाटी भोयर, ग्राम विकास अधीकारी डमाळे, कृषी सहायक दीपाली वैध्य, बार्शीराम मानोले, वाघमारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here