वादळी वा-यासह गारपीट! झाडे उन्मळून पडली; घरावरचे छप्पर उडाले: शेतकर्यांच्या फळबागा जमीनदोस्त

राहुल काशीकर

पवनार : जिल्ह्यात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळ वार्‍यासह गारपीट व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात परिसरातील नागरीकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरावरचे छप्पर उडाले. विद्युत पुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, वादळ-वार्‍यामुळे रोडलगत असलेली अनेक झाडे उन्मळून खाली पडली. यात अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली.

६ वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार पावसाचे आगमन झाले. वादळ वार्‍यासह झालेल्या पावसाने परिसरातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठमोठे वृक्षही उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. यात एक घर पुर्णपणे जमीनदोस्त आल्याची घटना घडली. यात गरीब लोकांचे घराचे मोठे नुकसान झाल्याने त्याच्यापुठे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अचानक झालेल्या वादळी पावसाने परिसरातील शेतकर्यांचेही अतोनात नुकसान झाले. परिसरातील सुनील निंबाळकर याच्या शेतातील केळीची बाग जमीनदोस्त झाली यात त्याचे जवळपास सात लाखांचे नुकसान झाले. परिसरातील इतर शेतकर्यांच्याही फळांच्या बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे शासनाकडू भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here