वर्धा : माझ्यावर प्रेम का करत नाही, असे म्हणत महिलेचा विनयभंग करीत मारण्याची धमकी देण्यात आली. सावंगी नजीकच्या गौरीनगर परिसरात ही घटना घडली. महिला भांडी घासत असताना शुभम भिवगडे याने अनाधिकृतपणे घरात प्रवेश करून तु माझ्यावर प्रेम का करीत नाही, असे म्हणून महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.