वर्धा : हॉटेल बुकींगचे रिफंड करायचे असल्याचे सांगून महिलेला ४६ हजार २५० रूपयांनी ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रतिक्षा डांगे यांनी रद्द केलेल्या हॉटेल बुकींगच्या रिफंडसाठी ईमेलद्वारा तक्रार केली होती. दुपारच्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि हॉटेलच्या बुकींगचा क्रमांक विचारला आणि ज्या डेबीटकार्डाने पैसे भरले होते त्याचा शेवटचा चारअंकी क्रमांक विचारला. अज्ञाताने आधी १० रुपये तक्रार शुल्क पाठविण्यास सांगितले.
दरम्यान प्रतिक्षाने १० रुपये पाठविण्याचा प्रयत्न केला.पण, पैसे जात नव्हते. दरम्यान अज्ञाताने मोबाईलवर अँप इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यातील ९ अंक क्रमांक विचारून नेटबँकींगद्वारे पैसे पाठविण्यास सांगितले. काही वेळातच महिलेच्या बँक खात्यातून ४६ हजार २४५० रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला. त्याप्रुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रतिक्षा डांगे यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढल्याने दक्षता गरजेची आहे.