हिंगणघाट : ‘शिक्षक ध्येय’ महाराष्ट्र आणि मातृसेवा फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक वर्ग आहे. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे. महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.
1) उपक्रमाचे शीर्षक
2) सामाजिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती अथवा
3) शैक्षणिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती
4) उपक्रमाची गरज व महत्त्व स्पष्ट करावे.
3) नियोजन कसे केले?
4) प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली?
5) उपक्रमाचा निष्कर्ष काय?
6) उपक्रमाचे फायदे कोणते आणि कोणाला झाले?
7) परिशिष्टे
8) उपक्रमाची सद्यस्थिती
9) यु-टूब व्हिडीओ लिंक असल्यास
10) उपक्रम स्वतः राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र
11) मिळालेले विविध शिफारसपत्रे आणि पुरस्कारांची नावे
12) योग्य ठिकाणी फोटो आवश्यक
या मुद्द्यांचा समावेश असावा.
शब्दमर्यादा ३००० शब्द असून जास्तीत जास्त निवडक १० फोटोचा वापर करावा. अहवाल १० एम बी पर्यंत (जास्त नको) पीडीएफ स्वरूपात तयार करून पाठवायचा आहे. महिलांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाईप करुन तयार करावा.
सदर उपक्रम हा यापूर्वी स्वत: राबविलेला असावा. उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०२१ आहे.
राज्यातील २१ (एकवीस) उपक्रमशील महिलांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र घरपोच पाठविण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र मेलवर/व्हाट्सऍप नंबरवर पाठविण्यात येईल.
दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड केली जाईल. एका प्रस्तावासाठी नोंदणी शुल्क २०० रुपये असून दि. ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिनी’ साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये निकाल जाहीर करण्यात येईल.
राज्यातील उपक्रमशील, कर्तृत्ववान महिलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन ‘शिक्षक ध्येय’चे संपादक मधुकर घायदार, मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या (सामंत) सावंत; कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे; मुख्य सहायक संपादक रमेश खरबस; विलास निकम, जळगाव; दीपाली बाभुलकर, अमरावती; ताई पवार, अहमदनगर, विद्या वालोकर, वर्धा, अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी; प्रणाली कोल्हे, नागपूर, राजेश चायंदे, अमरावती, रंजना कोळी, जळगाव; कविता चौधरी, जळगाव; अरुणा उदावंत, जळगाव; डी जी पाटील, नंदुरबार; सुधाकर जाधव, औरंगाबाद; प्रेमजीत गतिगंते, मुंबई, तारीश अत्तार, सांगली; संजय पवार, रायगड; आयेशा नडाफ, सांगली; मनीषा लावरे, रायगड; निलेशकुमार इंगोले, अमरावती, अजय काळे, सांगली; सुमैया तांबोळी, सोलापूर; उषा कोष्टी, मंगळवेढा, सोलापूर; लता पांढरे, रत्नागिरी; माधव गावित, नाशिक; दत्तात्रय खोबरे, उस्मानाबाद; श्रद्धा पवार, पाचोरा; दिलीप वाघमारे, सांगली; दत्तात्रय भालके, बीड; डॉ. संजय पाचभाई, नागपूर यांनी केले आहे.