आर्वी : घराच्या वाटणीच्या कारणातून मुलगा व सुनेने वडिलांना काठीने मारहाण केली. श्रीराम वॉर्ड परिसरात ही घटना घडली, शेषराव लोखंडे हे घरी असताना मुलगा प्रदीप लोखंडे आणि त्याची पत्नी शारदा लोखंडे हे घरासमोर आले आणि घर नावावर करून देण्यास म्हणत होते. दरम्यान शेषराव यांनी मी तिन्ही मुलांना बरोबर वाटणी करून देतो, असे म्हटले असता प्रदीपने व शारदा हिने शिवीगाळ करून शेषराव लोखंडे यांना काठीने मारहाण केली. याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.