

कारंजा (घा.) : शिवीगाळ करण्यास हटकले असता महिलेस दगडाने मारहाण करण्यात आली. धावसा हेटी वेथे ही घटना घडली. अरुण धावलकर हा सुनंदा वझरकर हिच्या अर्ध्या प्लॉटवर घर बांधून राहत आहे. सुनंदा ही घरी असताना अरुणने तू गव्हाची खाली कोठी माझ्या घराकडे का आणून ठेवली, असे म्हणून शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्यास हटकले असता अरुणने दगडाने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी कारंजा पोलिसात पोलिसात दाखल करण्यात आली आहे.