हिंगणघाट : युवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी राजू पुंडलिक वादाफळे रा. कडाजना ता. हिंगणघाट याला सहा महिन्यांचा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी रत्नमाला वी. इफरे यांनी ठोठावली. प्राप्त माहितीनुसार, १८ सप्टेबर २०१७ ला बिडकर कॉलेज येथून हिंगणघाट येथील बसस्थानकावर जाणाऱ्या पीडितेचा आरोपी राजू वादाफळे याने विनयभंम केला होता.
या प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. पो.ह.वा. परमेश्वर झांबरे यांनी तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. या प्रकरणी दहापैकी सहा साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद तसेच पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश रत्नमाला डफरे यांनी राजू वादाफळे याला दोषी ठरवून कारावासासह दंडाशी शिक्षा ठोठावली आहे. शसकीय बाजू अँड. सचिन डी. गावडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पो.ह.वा. ज्ञानेश्वर हाडके यांनी काम पाहिले.