वर्धा : खासदार रामदास तडस यांच्या स्थानिक विकास निधीतून तीन दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी मोपेडचे वाटप करण्यात आले, तसेच दीड कोटी रुपयांच्या विकासकामाचा प्रारंभ करण्यात आला. स्थानिक ठाकरे चौक येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार रामदास तडस उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा.नरेंद्र मदनकर, सभापती मारोती मरघाडे, नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, नगरसेवक कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनिता ताडाम, सुनिता बकाने, विजय गोमासें उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींनी हाताळलेले व्यवसाय, तसेच त्यांच्या दैनंदिन कामात मदत होण्यासाठी तीनचाकी मोपेड वाटपाला प्राधान्य दिल्या जाते. समाजात दुर्लक्षित ठरलेल्या या घटकाला मदत करण्याच्या हेतूने कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे रामदास तडस यांनी सांगितले. यावेळी काळा पुलापर्यंतच्या दीड कोटी खर्चाच्या रस्ते अनुदान, तसेच दलित वस्ती विकास अनुदानातून या रस्त्याचे बांधकाम घेण्यात आले. स्वातंत्र्य सेनानी व माजी आमदार महादेवराव ठाकरे यांच्या नवनिर्मित पुतळा जुन्या जागी बसविण्यासाठी या परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम घेण्यात आले, याप्रासंगी न.प. मुख्याधिकारी विजय देवळीकर, प्रकाश कारोटकर, न.प.तील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते.दिव्यांग महिला शालू मुरलीधर झाडे व पद्मा नामदेव चौधरी, दोघेही रा. देवळी व प्रेमकुपार नाईक रा. सेवाग्राम यांना खासदार तडस यांचे हस्ते मोपेड गाडीची चाबी देऊन सन्मान करण्यात आला.