मुलीस पळवून नेत केला अत्याचार

वर्धा : अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ‘पोळीस तपासात उघडकीस आली. ही घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ग्रावात घडली, १७ वर्षीय पीडितेला अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार पुलगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, पोलिसांनी तपास केला असता ती आरीफ पठाण या युवकासोबत पळून गेल्याचे समजले. पोलिसांनी पीडितेला शोधून तिचे बयाण घेतले असता आरिफ पठाण, रा. मंगरुळ दस्तगीर याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पीडितेचे लैंगिक शोषण केल्याचेही पोलीस तपासात पुढे आल्याने पीडितेच्या बयाणावरून आरोपी आरिफ विरुद्ध पुलगाव पोलिसात पोस्को सहकलमान्वये गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here