वर्धा : शेताचे काम आटपून बैलबडीने घरी जात असलेल्या शेतकऱ्यांला पिपरी (मेघे) परिसरात जुना पाणी चौक येथे मद्यधुंद असलेल्या वाहन चालकाने इंडिका कारने जबर धडक दिल्याची घटना 30 डिसेंबरला घडली. या धडकेत शेतकरी व बैलजोडीला गंभीर दुखापत झाली, जखमी बैलावर उपचार सुरू असताना सोमवारी ता. 25 जानेवारी ला एक बैल मृत्यूमुखी पडला. यामुळे शेतकरी रामदास पेंदाम (वय ५०) यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी बैलबडीने घेऊन घरी जात असताना, एमएच 29 – एल 390 या क्रमांकाच्या इंडिका विस्टा या गाडी चालकाने वाहन हलगर्जीने व निष्काळजीपणे चालवून बैलगाडीला जबर धडक दिली. या घटनेचा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात नोंदवीन्यात आला होता. घटनास्थळी सदर कारमध्ये विदेशी दारू सुद्धा सापडली होती. कार जप्त करीत रामनगर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली.
पाहिलेचशेतकरी आर्थिक संकटामुळे सापडला आला आहे. जखमी शेतकरी रामदास यांचा जखमी झालेला बैल मृत्यूमुखी पाडल्याने , शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकरी रामदास पेंदाम यांच्या समोर निर्माण झाला आहे.
आर्थिक विवंचनेत असल्येल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल या आशेने त्याला पोलिस स्टेशनला चकरा माराव्या लागत आहे. मृत बैलाचे शवविच्छेदन करण्यासाठी पोलीस प्रशासनास कळविले असताना सुद्धा पोलिसांनी घटनास्थळी आले नाही. पशुवैधकीय अधिकारी डॉक्टर वरभे यांनीही रामनगर पोलीस कर्मचऱ्याशी संपर्क केला असता दुचाकी खराब असल्याचे सांगून घटनास्थळी पोहोचले नाही. शेवटी डॉक्टर यांनी गावातील पंचसंमक्ष शवविच्छेदन पार पाडले. शेतकऱ्याप्रति पोलिसांच्या भावनाशून्य झाल्या काय? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
याप्रकरणी रामनगर पोलीस काय कारवाई करणार याकडे पिपरी वासीयांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्याला शासकीय मदत देण्यात यावी अशी, मागणी जोर धरत आहे.