बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा मकरसंक्रांत मिलन सोहळा संपन्न! शिवसेना सेलू तालुक्याच्या वतीने आयोजन

वर्धा : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि. २३ जानेवारी रोजी शिवसेना सेलू तालुक्याचे वतीने शितलदास महाराज मठ येथे महिलांचा मकरसंक्रांत मिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संपर्कप्रमुख अनंतराव गुढे होते तर जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, उद्योजक शैलेश दप्तरी, उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे, निवासी उपजिल्हा प्रमुख गणेश इखार, युवासेना जिल्हाप्रमुख अभिनंदन मुनोत, रविंद्र चव्हाण, बाळाभाऊ साटोने, रमाकांत मोरोने, तालुका प्रमुख सुनिल पारिसे, शहरप्रमुख राकेश मंशाणी, मुन्ना शुक्ला, खुशाल राऊत, अनिकेत जगताप, बालू वसू, महिला आघाडीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य सारिका देवतारे, वडतकर ताई, चंदा चव्हाण, स्नेहल देवतारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करून छत्रपती शिवराय व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी अनंतराव गुढे यांनी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ह्या दोन्ही महापुरुषांचा जन्मदिवस हा एकाच दिवशी येतो हा योगायोग आहे.महिला मेळाव्याला संबोधित करतांना गुढे म्हणाले की नुकतेच ठाकरे सरकारने महिलांना शक्ती कायदा लागू केला असून कठोर शिक्षेची तरतूद ह्या कायद्यात असल्याने महिलांवरील अत्याचार कमी होतील असेही ते म्हणाले. सेलू नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना ७० लिटर प्रत्येक व्यक्तीला रोज पाणी पुरवठा केला जातो तो कमी असल्याने नुकतेच सेलू शहराला १३५ लिटर प्रत्येक नागरिकांना मिळण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना संदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे अनिल देवतारे त्यांच्या मागणीला पाठपुरावा केला असून लवकरच अंमलात येणार असल्याचे सांगितले. तसेच सेलू नगरातील पंतप्रधान आवास योजनेचा प्रलंबित निधी मिळवून देण्याबाबत नगरसेवक शैलेश दप्तरी यांच्या मागणीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मागणी करणार असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले यावेळी अनिल देवतारे, तुषार देवढे, गणेश इखार, शैलेश दप्तरी, स्नेहल अनिल देवतारे यांनीही संबोधीत केले. संचालन दिलीप भुजाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सेलू शहर प्रमुख गणेश कुकडे यांनी केले.

मेळाव्यात मोठया संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांना मकरसंक्रांत मिलन निमित्ताने हळदीकुंकू, मिष्ठान्न व वाणाचे वाटप महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाकरीता सुनिल पारिसे, सेलू शहरप्रमुख गणेश कुकडे, रोशन वांदिले, सुनिल ठाकरे, शुभम झाडे, मिथुन नलोडे, सुभाष भुरे, अमित बाचले, योगेश इखार, स्नेहल देवतारे, पूनम देवतारे, लीलाताई लाखे, शारदा माहुरे, रेखा कुकडे, स्वप्ना गडकर, नंदिनी इखार, निर्मला कुकडे, शुभांगी जगताप, सविता तेलरांधे, स्नेहल दिघडे, शालिनी दीक्षित,वंदना मानकर, विजय राऊत, संजय देवतारे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here