पवनार येथील यूवकाचा उपचारादरम्यान अपघाती मृत्यू! ब्रेकरवरुन उसळली होती दुचाकी

पवनार : अल्लीपुर येथील शाळेजवळ ब्रेकर असलेल्याचे लक्षात न आल्याने दुचाकी या ब्रेकरवरुन उसळली आणि रस्त्याच्या कडेला पडली यात डोक्याला मार लागुन गंभीर जखमी झालेल्या युवकाचा आज सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.

अविनाश हजारे रा. पवनार असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अविनाश हा शुक्रवार (ता. १५) आपल्या दुचाकीने हिंगणघाटला जात असताना अल्लीपुर येथील शाळेजवळ असलेल्या ब्रेकरवरुन दुचाकी उसळली आणि अविनाश खाली पडला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली येथील नागरीकांनी त्याला उपचाराकरीता सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान यांचा रविवार (ता. २४) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here