सिंदी (रेल्वे) : हाथरस येथील अत्याचारग्रस्त पीडीत परिवारातील सदस्याच्या जीवीताला धोका असुन न्याय मिळेपर्यंत या परिवाराला शासणाच्या वतीने वाय पल्स सुरक्षा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय लहुशक्ती संघटना आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या शाखा सिंदीच्या वतीने मंगळवारी (ता.१३) एका निवेदनाव्दारे तहसिदार आणि ठाणेदार यांच्या मार्फत शासणाला करण्यात आली.
उत्तरप्रेशातील हाथरस येथील घटनेचा कडक शब्दात जाहीर निषेध करीत सदर गुन्हातील चारही आरोपी हे ठाकुर समाजातील असुन या समाजाचा येथे बोलबाला असुन सत्तेची सर्व स्थाने यांच्याच हाथी आहे. शिवाय येथे जातीय भेदभाव मोठ्या प्रमाणात असुन अत्याचार करणार्यांच्या बचावासाठी हे कोणत्याही थरा जाऊ शकतात. परिणामता पीडीत परिवारातील सदस्यांच्या जीवीताला धोका असुन शासणाने यांना ताबडतोब न्याय देण्याचे करावे शिवाय कठोर शिक्षा होत पर्यंत परिवाराला वाय पल्स सुरक्षा पुरवावी अश्या मागणीचे निवेदन शहरातील लहुशक्तीचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे आणि सफाई मजदूर कॉग्रेसच्या शहर अध्यक्ष रुपेश सारवान यांच्या नेतृत्वात सेलुचे तहसीलदार महेंद्र सोनवणे आणि सिंदीचे ठानेदार काळे यांच्या मार्फत शासणाला करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक रामावतार तुरक्याल, चमन जगदेव, संदीप जगदेव, नितीन सारवान, दत्ताजी सारवान, अशोकराव डोंगरे, नरेश बावणे, साईनाथ खंडाळे, संग्राम कळणे, राजूभाऊ जगदेव, मनीषा पांडव, गजानन खंडाळे, गंगाधर खंडाळे, वासू वर्जे, अज्जू शेख, आदी कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थित होती.