वर्धा : गत काही वर्षांपासून तापमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागत आहोत. गत उन्हाळ्यात तर याची तिव्रता अधिकच जाणवली. ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आपापल्या पातळीवर पर्यावरण संवर्धन करण्याचा निर्णय ‘माय मॉर्निंग गृप वर्धा’ तर्फे घेण्यात आला.
या गृप तर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. श्री. धनंजय नाखले (लिमका बुक वर्ल्ड रेकाॕर्ड प्राप्त) यांच्या पुढाकाराने स्वावलंबी क्रिकेट मैदान, वर्धा येथे पिंपळ वृक्ष लावून उस्फुर्तपणे हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी किरण पट्टेवार, गौतम सर, धनंजय राऊत, राम वानखेडे, रजनीकांत ठाणेकर, रामचंदानी, प्रविण हटवार, अजय गुप्ता, सुरेश कुंबलवार, सचिन मांगलेकर, श्री नागतोडे, शंकर मारडे, शेखर राऊत, रामदास ढोबाळे, गिरीश नाखले, यांनी सहकार्य केले.