दोन युवकांवर धारदार चाकुने वार! एकाची प्रकृती गंभीर; सिंदी (रेल्वे) येथील घटना

सिंदी (रेल्वे) : मोबाईल व व्हाट्सएपच्या काळात मोबाईल मध्ये मुलीचा फोटो ठेवल्यावरून उदभवलेल्या वादात शहरातीलच दोन युवकांनी दोन युवकांवर चाकुने हल्ला केल्याची घटना बुधवार (ता. २३) रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शहरातील कपिल पुरुषोत्तम कोपरकर (वय २५) व स्वप्नील भोले दोघेही रा. सिंदी रेल्वे आणि आरोपी सुरू शेख व फैजान अजीज शेख वय २१ रा. सिंदी रेल्वे यांच्यात फिर्यादीच्या चुलत बहीणीचा फोटो मोबाईल मध्ये ठेवण्यावरून बुधवारी (ता. २३) रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान शहरालगतच्या नेहरू शाळेच्या मैदानावर शाब्दिक वाद झाला वाद विकोपाला जाऊन परस्परात हाणामारी झाली.

या हाणामारीत आरोपी सुरू शेख, फैजान अजीज शेख यांनी धारदार हत्याराने फिर्यादी कपिल कोपरकर व स्वप्नील भोले या युवकांना भोकसले व घटनास्थळावरून पळून गले.

फिर्यादी कपील आणि स्वप्नील जीव वाचविण्याच्या आकांताने घराकडे पळत सुटले. घरी गेल्यावर वडिलांनी रक्ताने माखलेल्या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गंभीर जखम असल्याने येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सेवाग्राम रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारी वरून सिंदी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सुरू शेख व फैजान अजीज शेख यांच्या विरुध्द ३०७, ३२३, ५०६, ३४ सदर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून फैजान अजीज शेख याला अटक करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत वर्धा जिल्हा उपविभागीय अधिकारी पियुष जगताप यांनी घटनास्थळाला भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने, पोलीस शिपाई गजानन मस्के, संदीप सोयाम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या ताफ्यातील हवालदार इम्रान खिलजी, पोलीस शिपाई राजू वैद्य समांतर तपास करीत आहे. घटना घडल्या नंतर शेकडोच्या संख्येने नागरिक रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन समोर गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here