सेलू : महाराष्टातील गरीब महिलांचे आर्थिक व सामाजिक स्थान मजबूत करण्यासाठी जिवाचे रान करून संपूर्ण राज्यभर फिरून बचत गटाचे जाळे निर्माण करणाऱ्या राज्यातील वर्धीनीसह उमेद अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे त्यावर फेरविचार करून ग्रामीण जिवनोन्नती अभियान सुरू ठेवण्यात यावे व यात कार्यरत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा ग्रामविकास मंत्री यांना तहसीलदाराचे मार्फत सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोणाचे महामारीत अकरा महिन्यापासून याना मानधन मिळाले नाही अशातच शासनाने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. उमेद अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचारी वर्धीनी सिआरपी ईत्यादी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे खंडीत केलेले करार पुर्ववत करण्यात यावे सांगितले प्रमाणे सन २०२८ पर्यंत अभियान सुरू ठेवण्यात यावे जर बंद करायचे असेल तर सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषधेत सेवेतील रिक्त पदावर त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सामावून घेण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शशिकला क्षीरसागर, रश्मी पठाण, निलिमा उईके, नलू बाकडे, स्वाती मस्के, मंगला चौधरी, प्रतिभा भगत आदीसह तालुक्यातील सर्व वर्धिनीची उपस्थिती होती.