वर्धा : कोरोना आजाराने जिल्ह्यात थैमान घातले आहे. लॉकडाऊन मध्ये शिथिलता देताच रुग्ण संख्या वाढतीवर असतानाच येथील जिल्हा कारागृहात ४० वर्षीय कैदी कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोना आजार संसर्गजन्य आजार असल्याने, जिल्ह्यातील नागरिकांना याची बाधा झाली तर प्रशासनातील, पोलीस विभागातील या आजाराची लागणं झाली आहेत. कारागृहात असलेल्या कैद्यांना सोडण्याचे फर्मान राज्य सरकारने दिले असतांनाही राज्यातील अनेक कारागृहात कैद्यांना कोरोनाची लागणं झाली होती. येथील जिल्हा कारागृहात मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात असून, न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपींना कारागृहातील विलगिकरणात ठेवले जात असूनही, ४० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे प्रश्न निर्माण होत आहे. ४० वर्षीय कैद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती उप जिल्हा शल्यचिकित्सक अनुपम हिवलेकर यांनी दिली आहे.