

हिंगणघाट : येथील रा. सु. बिडकर महाविद्यालय येथे रोटरी क्लब ऑफ हिंगणघाट व बिडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त उपक्रमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे रक्ताची गरज विचारात घेऊन शिक्षक दिनाच्या निमित्याने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, महात्मा गांधी विचारधारा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा यांनी संयुक्तरित्या या शिबिराचे आयोजन केले होते. शासकीय रुग्णालय, वर्धा व जी. एस. के. ब्लड बँक, नागपूर अशा दोन चमू बोलाविण्यात आल्या होत्या .
या शिबिरात शंभरावर युवक व युवतींनी सहभाग नोंदविला शिबिरात सोशल डिस्टन्ससिंग, सॅनिटायझर व मॉस्कचा वापर करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थुटे, प्राचार्य डॉ. बी.जी.आंबटकर, उपप्राचार्य डॉ. बी.एम.राजूरकर, प्रा.आर.डी.निखाडे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख, डॉ. एम.के.तेलंग, प्रा.व्ही.एम.पुनवटकर, प्रा.व्ही.एस.बेले, डॉ.राजू अवचट, डॉ.ए.सी.बाभळे इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.