हिंगणघाट : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे शहर कोरोनाचे हॉस्पॉट होऊ लागले आहे. यामुळे प्रशासनाने अंटीजन टेस्ट सुरू केली आहे. यात शुक्रवारी नगर परिषद परिसरात केल्या गेलेल्या अंटीजन टेस्ट मध्ये हिंगणघाटचे नगराध्यक्ष पॉझिटीव्ह आढळले त्यामुळे प्रशासनाने नगरपरिषद तीन दिवसांसाठी सील केली आहे. नगराध्यक्षांच्या संपर्कात आलेले नगरसेवक, कर्मचाऱ्यांची यादी करुन त्यांची तपासणी सुरू केली आहे. शहराचे नगराध्यक्षांचा कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने प्रशासन, शहरवासीयांचे चिंतेत भर पडली आहे. हिंगणघाट शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाचे प्रादुर्भावामुळे शहरवासीयांचे चिंतेत भर पडली आहे.