सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रभाकरराव शिंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू

सेलू : येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रभाकरराव पांडुरंग शिंदे (वय ५९) यांचा आज सकाळी सहा वाजता नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.
ते मुळचे रेहकी येथील रहिवासी असून सध्या वर्धा येथे वास्तव्यास होते. नुकतेच ते सेलू पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हमदापूर येथील केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते. गेल्या महिन्यात ३ ऑगस्ट रोजी ते शेतात जात असताना त्यांची दुचाकी अपघातग्रस्त होत झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दि. ८ ऑगस्ट रोजी नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तीथे त्यांना अचानक कोरोनाची लागण झाली व आज सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुन असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here