सतीश खेलकर
पवनार : येधील धाम नदीपात्रात दरवर्षी हजोरो गणेश मुर्तींचे विसर्जन होते यातून धाम नदीपात्र मोठ्या प्रमाणात प्रदुषीत होत होते. या नदीपात्रात मुर्ती विसर्जनाकरीता विसर्जण कुंड व्हावा अशी मागणी येथाल माजी सरपंच अजय गांडोळे यांनी सातत्याने लावून धरल्याने सेवाग्राम विकास आराखड्यातुन या विसर्जन कुंडाचे काम पुर्णत्वास आले यावर्षी याच कुंडात मुर्ती विसर्जण होत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात धाम नदीचे होणारे प्रदुषन थांबणार आहे.
यावर्षी नदीपात्रात एकही मुर्ती विसर्जीत होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाप्रशासन व सेवाग्राम पोलिसांकडून धाम नदीपरिसरात दगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बंदोबस्तामध्ये एक पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षक, ६५ पोलिस कर्मचारी व १० होमगार्ड तैणात आहे. नदीपात्राकडे कुनीही जानार नाही व मुर्ती विसर्जीत करणार नाही याकरीता पोलिसांचा वेगळा बंदोबस्त आहे तर मुर्ती ह्या केवळ कृत्रीम विसर्जणकुंडातच विसर्जीत केल्या जाव्यात याकरीता दुसरी तुकडी तैणात आहे.
यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे मुर्ती विसर्जणाकरीता सार्वजनीक गणेश मंडळातील केवळ चार लोकांना तर घरघुती गणपतींसोबत दोन लोकांनाच विसर्जणाकरीता कुंडाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जनाकरीता जास्त लोकांनी गर्दी करु नये तसेच या परिसरात कोणत्याही प्रकाचे वाजंत्र्य घेवुन येन्याय मनाई करण्यात आलेली आहे.
प्रतिक्रीया….
धाम नदीपात्रात एकही मुर्ती विसर्जीत होणार नाही याची पोलिस प्रशासन खबरदारी घेत आहे. विसर्जनाकरीता स्वतंत्र विसर्जणकुंडाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याच ठीकाणी मुर्ती विसर्जीत होतील याची दक्षता घेतली जात आहे. यावर्षी विसर्जनाकरीता गणेश भक्तांनी गर्दी करण्याचे टाळत पर्पुयावरणपुरक मुर्ती विसर्जन करावे.
कांचण पांडे, ठाणेदार पोलिस स्टेशन सेवाग्राम
धाम नदीपात्रात जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या जवळपास घरघुती व सार्वजणीक मुर्तींचे निसर्जन होत होते. परिणामी मोठ्या प्रमाणात नदी प्रदुषीत होत होती. मुर्ती विसर्जनाकरीता स्वतंत्र विसरजनकुंड व्हावा याकरीता सातत्याने पाठपुरावा केल्याने आज पर्यावरणपुरक मुर्ती विसर्जण होत आहे यातुन धाम नदीचे प्रदुषणाचा धोका थांबनार आसल्याने याचे आम्हाला खुप समाधान आहे.
अजय गांडोळे, माजी सरपंच पवनार