

पवनार – शेतात जुगार चालू असल्याच्या माहितीवरुन सेवाग्राम पोलिसांनी श्री तिघरे यांचे शेतावर धाड टाकून १२ जुगारांना अटक केली. ही घटनाघटन काल रात्रीच्या सुमारास पवनार परिसरात घडली.
यात मोबाईल दुचाकी व मोठी रक्कम जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांची दिली.
सविस्तरवृत्त जाणून घेतले असते मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांचे नेतृत्वात जमादार सचिन पांडे, श्री चुटे यांनी सोमवारचे रात्री १२ वाजताच्या सुमारास श्री तिघरे यांचे शेतावर धाड टाकली यात नितीन झाडे, संदीप दांडेकर, महेंद्र पेटकर, उमेश उमाटे, राजेश बावणे, ज्ञानेश्वर वाटमोडे, अंबादास झाडे, नीरज जिंदे, विशाल उमाटे, हाशिम पठाण, किशोर उमाटे, अनिल महाजन, (सर्व राहणार पवनार) यांचेवर भा द वि १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई सेवाग्राम पोलिस करीत आहे.