भरधाव कारने ऑटोला दिली जोरदार धडक ; दोन गंभीर जखमी ! पवनार बसस्थानक परिसरातील घटना

पवनार, ता. २३ : भरधाव वेगात असलेल्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिली या धडकेत अतोटील दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार (ता. २३) पवनार येथील बसस्थानक परिसर घडली. गंभीर जखमीना सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरिता दखल करण्यात आहे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पवनार येथील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून सेवाग्रामकडे निघालेला MH32AK0238 ऑटो बसस्थानकाजवळील चौकात रस्ता ओलांडत असताना नागपूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (क्र. MH14 FC 8989) ने त्याला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटोचे मोठे नुकसान झाले असून, त्यामधील एक प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात घडल्यानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, या अपघातात संबंधित कारचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. जखमींची नावे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here