व्यक्तिमत्व विकासाकरिता ज्ञानाबरोबरच धाडसाची गरज! सुरेश गणराज यांचे प्रतिपादन

वर्धा : व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर असलेल्या ज्ञानाला धाडसाची जोड देणे गरजेचे आहे. त्याकरिता सर्वप्रथम आपल्याला आज खऱ्या ज्ञानाची गरज कोणती आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. तेव्हाच व्यक्तीचा विकासामध्ये वाढ होऊ शकते असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध मोटीवेशनल स्पीकर सुरेश गणराज यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब मेडिकोज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेमध्ये आपले विचार मांडले.

पूढे बोलताना ते म्हणाले की, जेव्हा लिहिता वाचता येत नव्हते तेव्हा सुद्धा ज्ञान प्राप्त होत असे, ते म्हणजे कथन,श्रवण आणि स्मरण या माध्यमातून, नंतरच्या काळात मात्र लिहिता वाचता येत असल्यामुळे त्या ज्ञानामध्ये ज्ञानाला समजून घेण्यासाठी आकलन, स्मरण आणि सादरीकरण या माध्यमातून ज्ञान संपादन करावे लागले. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला आज व्यावहारिक ज्ञानाची गरज भासली आणि ती म्हणजे निरीक्षण, परीक्षण आणि अनुभव या टप्प्यांची. या टप्प्यांमध्ये अनुभव अतिशय महत्त्वाचा आहे आणि अनुभवाकरिता काही विशेष शिक्षण घेतलेच पाहिजे याची काही गरज नसते. अनुभवाच्या आधारे आपण आपली प्रगती करू शकतो, असे मत सुरेश गणराज यांनी

ज्ञानासोबतच धाडसाचे उदाहरण देताना ते पुढे म्हणाले की, ॲमेझॉन या ऑनलाइन घरपोच सेवा पुरविणाऱ्या कंपनी मध्ये सचिन बिंद्दल आणि बिन्नी बिंदल काम करीत होते. त्यांनी लठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यातून धाडस दाखवून ते बाहेर निघाले व त्यांनी फ्लिपकार्ट नावाची घरपोच सेवा देणारी कपंनी काढली.दिल्ली येथील आय.आय. टी.मध्ये एमबीए केले होते. तेव्हा आपण सचिन बिंदल आणि बिन्नी बिंदल या दोघांचे अवलोकन करून उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सुरेश गणराज यांनी केले. त्याकरिता ध्येय निश्चित करा व मन हे नेहमी तरुण असू द्या.

गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी शैक्षणिक प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई, लायन्स क्लब मेडोकोजचे ऍक्टिव्ह चेअर पर्सन डॉ. प्रवीण धाकटे, विना मासुरकर, लायन डॉ. स्वप्निल अलोणे, संध्या भगत, कल्पना भगत उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला एम.एस.डब्ल्यूचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here