वर्धा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.