शेतात वीज कोसळून महिला ठार! तीन गंभीर जखमी

वर्धा : शेतात काम करताना अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी महिला जागीच ठार झाली. इतर तीन शेतमजूर महिला गंभीर, तर दोघी किरकोळ जखमी झाल्या. ही हृदयद्रावक घटना गुरुवार (ता. २६) दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास जुवाडी शिवारात घडली. मंदा प्रभाकर वाघमारे (५५), रा. जुवाडी, असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here