अंध व मुकबधिर विद्यालयात वाढदिवस साजरा! च्रंद्रभानजी हाडके यांचा उपक्रम

वर्धा : ‘परमात्मा एक’ मार्गदर्शक नेरी पुनर्वसन सालोड (हि.) येथील चंद्रभानजी हाडके यांनी आपला वाढदिवस अंध व मुकबधिर विद्यालयात तसेच मुला मुलींचे बालगृह नालवाडी येथे शंभर विद्यार्थी व इतर सेवक व शिक्षिकेत्तर कर्मचारी गण यांच्या उपस्थितीत साजरा केला. या कार्यक्रमाला कार्यक्रमाला अंध व मुकबधिर विद्यालयाच्या अध्यक्ष उषाताई फाले, वुमन अँन्ड चाईल्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष घेतन वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यालयाच्या वतीने चंद्रभान हाडके यांना पुष्पगुच्छ शाल श्रिफळ देवून शुभेच्छा दिल्या. श्री. हाडके हे सेवानिवृत्त कर्मचारी असून मागील पंधरा वर्षापासून व्यसनाच्या आधीन झालेल्या लोकांना व्यसनमुक्त करण्याचे कार्य करीत आहे. त्यांचा वाढदिवस कार्यक्रम अंध व मुकबधिर विद्यालय येथे साजरा करण्यात आला. यावेळी शंभर विध्यार्थ्यांना शालेय साहित्य भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाला निलेश कोहाड, राजू कुकडकर, संजय कुकडकर, विजय राऊत, गौरव पाटील यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here