

वर्धा : पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून चोरीतील चार दुचाकी जप्त केल्यात. ही कारवाई सेवाग्रामपोलिसांनी केली. सेवाग्राम पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान आर्वी पोलिसांनी नयन मिलींद गायववाड (वय १९), रा. कोसुर्ला ता. हिंगणघाठ, मोहम्मद फैजान मोहम्मद फिरोज (वय २०), रा कामरगाव, ता. कारंजा, जि. वाशिम, सैय्यद सलमान सैय्यद साबीर (वय २१), रा. मसला, ता. कारंजा, जि. वाशिम यांना अटक केली असून आरोपींनी सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती मिळाली.
आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने प्रॉडक्शन वॉरंठवर ताब्यात घेवुन अठक केली. अठकेदरम्यान आरोपीकडून चार दुचाकी असा १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपरपोलीस अधीक्षक सागरकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनित घागे यांच्यासह पोलीस स्ठेशन सेवाग्राम येथील पोलीस अंमलदार हरीदास काकड, गजानन कठाणे, अभय इंगळे, सचिन सोनटक्के, मगेश झांबरे, सजय लाडे, मंगेश तराळे यांनी केली.