पवनार : देशाच्या रक्षणाकरीता सिमेवर पहारा देणारे गावातील सेवानिवृत्त सैनिक सागर हिवरे व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनिष ठाकरे यांचा वार्डातील नागरीकांनी वर्गणी गोळा करीत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. हा सत्कार म्हणजे त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामाची पावती अाहे. असे मत पंचायत समितीचे माजी सदस्य प्रमोद लाडे यांनी व्यक्त केले. येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये हा सत्कारसमारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र बांगडे, माजी पंचाय समिती सदस्य प्रमोद लाडे, माजी ग्रामपंचात समिती सदस्य अशोक भट, मोरेश्वर हुलके, राम मगर, मोरेश्वर आदमने, वासुदेव मोहिजे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पवनार येथील वार्ड नंबर दोनचे माजी ग्रामपंचायत सदस्य मुनेश्वर ठाकरे यांनी त्याच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या वार्डात लोकहीताची कामे केली. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल तसेच सागर हिवरे यांचा सेनेतील देशसेवेचा पदभार संपल्याने वार्डातील नागरिकांतर्फे सत्कार समारंभ आयोजीत केला होता. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दोन्ही माण्यवरांचा सत्कार करण्यात आला. वार्डातील नागरीकांकडून वर्गणी गोळा करुन हा सत्कार समारंभ पार पडला हे विषेश. कार्यक्रमाकरिता ईश्वर डोळसकर, दीपक येळणे, अजय काकडे, गणपत घुगरे, रामभाऊ उमाटे, रांजना आंबटकर, रवि आंबतकर, गजानन शेंडे, शुभम खंते, पियूष देवतळे, शंकर पेटकर, संदीप घुगरे, शालिक हिंगे, रमेश शेंडे , सुभाष घोडमारे यांनी सहकार्य केले .