भरधाव कार खाईत उलटली! तीन पलट्या, तिघे किरकोळ जखमी

समुद्रपूर : नांदेड -किनवट येथून पवती तालुक्‍यातील दिघोरी गावाकडे जात असलेली कार अनियंत्रित झाल्याने शहरालगतच बाभूळकर यांच्या शेताजवळ असलेल्या खाईत उलटली. कारने तीन पलट्या खाल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नसून कारमधील तिघेही किरकोळ जखमी झाले. हा अपघात १५ रोजी सायंकाळी झाला. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली. पल्लवी प्रेमराज करंजेकर (3५), महती उमेश गिरपुंने (१२), श्रेयस उमेश गिरपुंजे (९) सर्व रा. दिघोरी अशी जखमींची नावे आहे.

पल्लवी करंजेकर या नांदेड जिल्ह्यातील किनवट सारकनी येथील आदिवासी शाळेत शिक्षिका आहेत. त्या मुलांसह किनवट येथून पवनी तालुक्‍यातील दिघोरीला कारने (एमएच. 3१ बीसी. १६३०) जात असताना समुद्रपूर शहरानजीकच अचानक स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित झाली आणि शेतालगत असलेल्या खाईत तीन पलटी खात कोसळली. यात तिघेही किरकोळ जखमी झाले. याच ठिकाणावर आतापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र, यावर कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने अपघातांची मालिका अद्याप सुरूच आहे. या रस्त्यावर त्रिकोणी मोडीचा रस्ता असल्याने समोरील वाहने दिसून येत नाही. वेगाने येणारे वाहन अनियंत्रित होऊन अपघात होतात. याकडे लक्ष देत तत्काळ उपययोजना करण्याची गरज आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here