वर्धा : महागड्या कारमधून देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा घालून १२ लाख 3७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वडनेर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पिपरी (पोहणा) येथे शुक्रवारी करण्यात आली. संगतसिंग जुनी, रा. वडनेर व अन्य एक अशा दोघांविरुद्ध वडनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माहितीनुसार अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या आधारावर नाकाबंदी करून पोलिसांनी छापा घातला असता संशयित एमएच २७ बी व्ही ७३२८ क्रमांकाच्या कारला थांबण्यासाठी सांगितले असता आरोपीतांना संशय आल्याने अंधाराचा फायदा घेत संगतसिंग जुनी, रा. वडनेर, कारचालक दोघांनीही कार सोडून घटनास्थळावरून पळ काढला. कारची झडती घेतली असता कारमधून 33 खर्डाचे खोक्यामध्ये देशी दारू १८० एम.एल. च्या एक हजार ५८३ शिशा असा दोन लाख 3७ हजार ४५० रुपये तसेच ब्रेझा एम. एच. २७ बी.व्ही ७3२८ क्रमांकाची कार असा एकूण १२ लाख 3७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वडनेर पोलिस ठरण्याचे पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, मनीष कांबळे यांनी केली.