वर्धा : शहरात मालमत्ता कर चूकविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सूचनापत्र देऊनही कर न भरणाऱ्या अशा चार गाळेधारकांच्या गळ्यांना पालिकेच्या कर पथकाने टाळे ठोकले. ही कारवाई गुरूवारी ७ रोजी बँचलर मार्गावरील इंदिरा मार्केट येथे करण्यात आली. तर विविध ठिकाणी जप्तीसाठी गेलेल्या करधारकांकडून १७ लाखांची वसुली करण्यता आली आहे.
जुने आर्थिक वर्ष संपत आल्याने पालिकेच्या वतिने सक्तीने कर वसूली सुरू केली आहे. यासाठी चार कर वसुली पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कर भरणा करणाऱ्यांना सूचनापत्र देण्यात आले होते. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने अशांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी पथकांनी भेटी दिल्या, यात तातडीने कराचा भरणा करून अनेकांनी जप्तीची नामुश्की टाळली. तर चार गाळयांना टाळे ठोकण्यात आले. यात दिवभरात १७ लाख रुपयाची वसुली करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई उपमुख्य अधिकारी अभिजीत मोटघरे, कर अधीक्षक संतोष डमरे, विधी अधिकारी चेतन ढवले, कार्यालय अधीक्षक रूपाली भाकरे, वसुली लिपिक अशोक गायकवाड, प्रकाश कोरेकर, मुनघाटे, सुहाडोर, फैय्याज शेख, रेवते आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते