

वर्धा : पाणी बॉटल आणि कोल्डिक्सचे पैसे मागितले असता संतापलेल्या ग्राहकाने पानटपरीचालकास व त्याच्या मुलास लोखंडी पट्टीने मारहाण करीत जखमी केलो, ही घटना मांडवगड बसस्थानक परिसरात घडली
याप्रकरणी २१ रोजी सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल केली. अरविंद विठ्ठल वनकर याची मांडवगड येथील बसस्थानक परिसरात पानटपरी आहे. विशाल येसनकर हा पानटपरीवर जात पाणी बॉटल आणि कोल्डिक्स मागितले. अरविंदने पैशाची मागणी केली असता विशालने कशाचे पैसे देऊ असे म्हणत अरविंदच्या कानशिलात लगावली. काही वेळाने विशालने घरून केली. दरम्यान, अरविंदचा मुलगा आकाश याने माझ्या वडिलांना मारहाण का केली, असे म्हटले असता विशालने लोखंडी पट्टीने मारले. वाद सोडविण्यास अरविंद मध्यस्थी गेला असता त्यालाही मारहाण केली.