सायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात! चार सायकली चोरल्याची दिली कबुली

वर्धा : शिखबेडा परिसरात एक व्यक्ती कमी किमतीत सायकल विकण्याकरिता आला असल्याची गोपनीय महिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोहचून आरोपीला ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी केली असता त्याने या सायकली जिल्हा परिषद शाळा बोरगाव मेघे येथून चोरल्याची कबूली दिली. आरोपीकडून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या चार सायकली जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, यांचे आदेशान्वये स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, नरेन्द्र पाराशर, सचिन इंगोले, अमरदीप पाटिल, राम ईप्पर, नितीन इटकरे, संगसेन कांबळे, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, चालक गणेश खेवले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here