वर्धा : एमडी हा अंमली पदार्थ हिंगणघाट शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून येत असलेल्या आरोपीला हिंगणघाट येथील मनसे चौकात पहाटेच्या सुमारास सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपीकडून कारसह 4 लाख 44 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वर्धा- हिंगणघाट स्थानिक गुन्हे शाखेकडून गुरुवारी करण्यात आली.
रात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, आरोपी सचिन रामकृष्ण मिशारकर (36, डांगरी वार्ड, हिंगणघाट) हा चारचाकी गाडीने (एमएच 13 एली 9133 ) नागपूर येथून एमड.( मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ हिंगणघाट शहरात विक्री करण्यासाठी घेवून येत आहे, अशी पोलिसांना माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात मनसे चौक, हिंगणघाट येथे सापळा रचून गाडीला थांबविली. गाडीचालक सचिन मिशारकर यास घेराब करून ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती व कारची चौकशी घेतली असता या वाहनामध्ये एका प्लास्टीक डब्बीमध्ये 7 ग्रॅम 870 मिली ग्रॅम वजनाचे किंमत 31 हजार 480 रुपयांचा एम. डी. (मॅफेड़ान) पावडर हा अंमली पदार्थ तसेच कार किंमत 4 लाख रुपये, मोबाईल किंमत 10 हजार रुपये व नगदी 3 हजार 500 रुपये, असा लाख 44 हजार 980 रुपयांचा मुहेमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशाप्रमाणे पोउपनी राम खोत, पोलिस अमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, पवन पन्नासे व अखिल इंगळे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी वसंत शुक्ला करीत आहे.