

वर्धा : कृषी विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्थेची ४६ वी आमसभा शिवपार्वती मंगल कार्यालय येथे पार पडली. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आमदार डॉ.श्री पंकज भोयर उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून कृषी उपसंचालक परमेश्वर घायतिडक व प्रमुख पाहुणे म्हणून भाष्कर मोघे, विलास मेघे, नानाजी ढोक, प्रदीप पांडे यांची प्रमुख उपस्थित होती.
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पतसंस्थेच्या कार्याच्या गौरव केला. विद्यमान संचालक मंडळ यांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये अशीच प्रगती करो ‘अश्या शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भोयर यांनी केले. कर्जावरील व्याजदर कमी करणे, मुदत ठेवी वरील व्याजदर वाढविणे, सभासदांच्या पाल्यासाठी लायब्ररी तयार करणे, सभासदासाठी आरोग्य शिबीर आयोजित करणे, नवीन शाखा विस्तार करणे अश्या नवीन योजनाची सुरुवात करत असल्याचे यावेळी घोषित केले.
प्रमुख पाहुणे श्री मोघे यांनी सभासदासाठी नवीन योजना राबविण्याकरिता काही सूचना केल्या. सभेचे अध्यक्ष परमेश्वर घायतिडक यांनी विद्यमान संचालक मंडळ यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. संचालन सुचिता रायपुरे यांनी केल. पतसंस्थेचे सचिव मोईन शेख यांनी आर्थिक ताळेबंद सभागृहसमोर सादर केला व त्यास मंजुरी घेतली. पतसंस्थेचे कोषाध्यक्ष यांनी नवीन इमारत बांधकामासंबधी लेखाजोखा सादर करून वस्तुस्थिती सभागृहासमोर ठेवली. आभार प्रदर्शन गणेश पिवळंटकर व विनेश थोरात यांनी केले. आमसभेकारिता उपाध्यक्ष अविनाश भागवत, सहसचिव ललिता राठोड, संचालक राहुल देशमुख, जितेंद्र रामटेके, सचिन जाधव, दीपक घुगे, जयश्री धांदे, सुचिता सयाम तसेच सर्व सभासद उपस्थित होते.