पुलाच्या कठ्ड्याला ट्रकची धडक! चालक ठार; समृद्धी महामार्गावरील आमगाव-खडकी शिवारातील घटना

सेलू : भरधाव आयशर या मालवाहू वाहनाने पुलाच्या कठड्याला धडक दिली. यात चालक जागीच ठार झाला. समृद्धी महामार्गावरील सेलू तालुक्यातील आमगाव-खडकी शिवारात बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हमीद आफताब सय्यद वय २३, रा. अझीमपुरा, ता. केज, बीड असे अपघातातील मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, बीड येथील आरेश ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच ४४ यू २८०७ क्रमांकाचे आयशर हा मालवाहू ट्रक शिमला मिरचीची पोती घेऊन निघाला होता. समृद्धी महामार्गावर वर्धा ते नागपूर दरम्यान आमगाव-खडकी शिवारात पहिल्या लेनमधून आयशर टूक जात असताना वाहनचालकाला झोपेची डुलकी आली. दरम्यान टूक अनियंत्रित होत रस्ता दुभाजकाच्या मध्ये असलेल्या पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळला. या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. अपघातानंतर वाहनचालकाचा मृतदेह केबिनमधेच अडकल्याने तो काढण्यासाठी फायर अण्ड रेस्झ्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. जाम येथील महामार्ग पोलिसांचे पथक देखील अपघातस्थळी दाखल झाले होते. मोठ्या प्रयत्नानंतर वाहनचालकाचा मृतेदह काढण्यात आला. उत्तरीय तपासणीकरिता रूग्णालयात पाठविण्यात आला. अपघात इतका भीषण होता की ट्रकचा दर्शनीय भाग मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाला. या प्रकरणात अधिक तपास सिंदी रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितळे यांच्यासह कर्मचारी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here