विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातात पवनार येथील यूवकाचा मृत्यू! घटनेने गावात पसरली शोककळा; नोकरीचा आनंद ठरला क्षणीक

वर्धा : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस अनियंत्रत होऊन उलटली. डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत २६ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता, की बसमधील प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. या अपघातात पवनार येथील युवक सुशील दिनकर खेलकर (वय २७) वर्षे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त कण्यात येत आहे.

पवनार येथील सुशील याने याच वर्षी पुण्यातील इंदिरा कॉलेज येथून आपले एमबीएचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तो गावी परतला. त्याला काही दिवसापुर्वी मुंबईतील एका कंपणीत चांगल्या पगाराच्या नोगरीच (सात लाख) पॅकेज पत्र आले. २ जुलैला त्याला कंपणीत जायचे असल्याने तो पुण्यात ज्या ठिकाणी राहत होत्या त्या ठिकाणाहुन आपल सर्व साहित्य घेवून तो २ तारखेला मुंबईला निघणार होता. शुक्रवार (ता. ३०) संध्याकाळी ६:३० वाजता तो सावंगी फाट्यावरून विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये प्रवासाला निघाला. रात्री गाढ झोपेत असताना अपघात होवून ट्रव्हल्सला आग लागली आणि क्षणात होत्याच नव्हत झाल. या आगीत सुशीलसह २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

सुशीलचे वडील दिनकर खेलकर यांचे गावात किराणा दुकान असून घरी शेतीवाडी आहे. सुशीलला एक लहान बहीण असून तो सधन कुटुंबातील होता. आई योगिता ही गृहिणी असून पतीच्या व्यावसायाला हातभार लावत होती. अपघाताची कुठलीच कल्पना नसल्याने सुशीलच्या कुटूंबीयांनी सुशीलच्या मोबाईलवर बरेचदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र मोबाईल बंद येत होता. बराच वेळेपर्यंत जिल्हा प्रशासन कडून त्यांना कुठलीही माहिती मिळाली नाही शेवटी अकरा वाजता सुशीलाचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या त्या जाहीर करण्यात आले.

मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच आईने हंबरडा फोडला. मुलगा गेल्याचे आभाळायेवढे दुख: लपवत घरच्यांना धीर देण्याचा प्रयत्न बापाने केला. या अपघाताने खेलकर कुटुंबावर मोठा आघात झाला असून एकुलत्या एक सुशीलचा मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली. आगीत होरपळलेल्या सुशीलची ओळख पटविण्यासाठी त्याची लहान बहिण, काका आणि जावई घटनास्थळी गेले होते. मात्र डीएनए रीपोर्डला विलंब होणार असल्याने मृतदेहावर सामुहीकरीत्या अंत्यसंस्कार होणार असल्याने सुशीलचे सर्व कुटूंब घटनास्थळी गेले आहे. वर्ध्याचे तहसिलदार रमेश कोळपे, मंडळ अधिकारी प्रवीण हाडे, पवनारचे तलाठी संजय भोयर, प्रदीप इंगळे, यशवंत लडके हे कालपासून घटनास्थळी आहेत ते सतत कुटूंबीयांच्या संपर्कात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here