

वर्धा : महाऊर्जामार्फत राज्यात महाकृषि ऊर्जा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पीएम कुसुम घटक ब योजनेच्या पुढील टप्प्यासाठी शेतक-यांना सौर कृषिपंपाकरीता 90 ते 95 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी शेतक-यांनी सौरपंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेंतर्गत राज्यात पारेषण विरहीत सौर कृषिपंपाची आस्थापना करण्यात येणार असून शेतक-यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. शेतक-यांच्या धारण क्षमतेनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी क्षमतेचे सौरपंप उपलब्ध होणार आहे. यासाठी सर्वधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याना कृषिपंप किंमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती किंवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. शेततळे, विहिर, बोरवेल, बारामाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शाश्वत पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असणारे, पारंपारिक वीज जोडणी उलब्ध नसणारे तसेच अटल सौर कृषि पंप योजना टप्प 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेंतर्गत अर्ज केलेले तथापी मंजुर न झालेले शेतकरी व अर्जदार योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.